सैनिक शाळेत प्रवेश मिळण्यासाठी बसवला 'डमी', 10 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

हरयाणा (Haryana) येथे सैनिक शाळेत प्रवेश मिळण्यासाठी परीक्षेला डमी विद्यार्थी बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा वर्षाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

सैनिक शाळेत प्रवेश मिळण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एका विद्यार्थ्याने डमी विद्यार्थ्यास परीक्षेला बसवण्याचा प्रताप केला. परंतु डमी विद्यार्थ्याने ज्या मुलाच्या नावाने प्रवेश परीक्षा देणार होता ते नाव लिहिता स्वत:चे नाव उत्तरपत्रिकेवर लिहिले. यामुळे डमी विद्यार्थ्याचा खोटेपणा उघडकीस आला.

या प्रकरणी परीक्षार्थी आणि त्याच्या पालकांची कसून चौकशी केली जाणार आहे. तसेच डमी विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन या प्रकरणी दोन शिक्षक आणि मुख्याध्यापक सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. तर हरियाणामध्ये परीक्षेच्या वेळेस 10 वर्षीय मुलाला अटक होण्याची ही पहिला घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.