Maoist | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Dantewada Naxal attack: छत्तीसगडच्या (Chhattisgarh) दंतेवाडा (Dantewada) येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या आयडी स्फोटामध्ये 10 जवान शही झाले आहेत. शहीद जवानांमध्ये 10 डीआरजी जवान आणि एका चालकाचा समावेश आहे. दंतेवाडाच्या अरणपूर भागात नक्षलवाद्यी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे सुरक्षा कर्मचारी तेथे दाखल झाले होते. या वेळी हा हल्ला झाला. या घटनेनंतर हल्ला झालेला परीसर बंद करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर डीआरजी जवान तैनात करण्यात आले आहेत.

जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे सुरक्षा कर्मचारी माओवाद्यांविरोधात कारवाया करत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या परिसरातून परतत असताना हे जवान माओवाद्यांच्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) हल्ल्याचे लक्ष्य बनले. जवानांचे वाहन परतत असलेल्या मार्गावर नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरली होती. (हेही वाचा, Dantewada Encounter: छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान, दंंतेवाडा पोलिसांची माहिती)

ट्विट

ट्विट

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, शहीद झालेल्या जवानांप्रतमी आम्हाला दु:ख आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर आहे. नक्षलवाद्यांना आम्ही सोडणार नाही. हा लढा अंतिम टप्प्यात आहे. नक्षलवादाचा बिमोड नजिकच्या टप्प्यात आला आहे.

ट्विट

ट्विट

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून नक्षली हल्ल्याचा तपशील मागितला. तसेच, नक्षलवाद विरोधी लढ्यात छत्तीसगड सरकारला केंद्राकडून पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली.