Balakot Airstrikes 1st Anniversary: बालाकोट एअर स्ट्राईकला 1 वर्षे पूर्ण; असा घेतला पुलवामा हल्ल्याचा बदला
File photo for representation only

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pulwama Attack), भारताचे तब्बल 40 जवान शहीद झाले. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी, भारतीय हवाई दलाने या 40 सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला. भारताने हवाई हल्ल्याद्वारे पीओके, बालाकोट (Balakot), खैबर पख्तूनख्वा येथे जैशच्या दहशतवादी छावणीला लक्ष्य केले. इतकेच नाही तर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये प्रवेश करून त्यांना त्यांच्याच प्रांतात धूळ चारली. आज या घटनेला 1 वर्षे पूर्ण होत आहे (1 Year Of Balakot Air Strike)

या हवाई हल्ल्यात हवाई दलाने जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी तळांवर बॉम्बस्फोट केला होता. 26 फेब्रुवारीला, एअरफोर्सने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी तळावर हल्ला करण्यासा,ठी 12 मिराज 2000 लढाऊ विमानांचा वापर केला. गोपनीयता राखण्यासाठी या ऑपरेशनला 'ऑपरेशन मंकी' असे नाव देण्यात आले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधील विविध दहशतवादी छावण्यांचा शोध घेतला. पुलवामा हल्ल्यात सामील झाल्यामुळे जैशने चालवलेले बालाकोट येथील दहशतवादी तळ निवडले गेले.

या मिशनबाबत पूर्णतः गोपनीयता बाळगत, हल्ल्यासाठी पंजाबमधील बहावलपूर, मुझफ्फराबादजवळ सवाई नाला आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट (केपीके) अशी असे तीन मुख्य तळ निवडण्यात आले. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान एलओसीच्या आसपासच्या भागाचे परीक्षण केले गेले. एअरफोर्सबरोबरच इतर गुप्तचर यंत्रणांनीही दहशतवादी संघटनांचा योग्य ठावठिकाणा सांगितला. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी 22 फेब्रुवारी, टारगेटची पुष्टी कोटी व सरकारला तशी माहिती कळवली. (हेही वाचा: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला)

हल्ल्यासाठी त्याच दिवशी मिशन सक्रिय करण्यात आले. आला. 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान, एअरफोर्सने आपली वन स्कॉड्रॉन टायगर्स, सेव्हन स्कॉड्रॉन बॅटल एसेस आणि मिराज स्कॉड्रॉनची 12 विमाने तयार केली. 24 फेब्रुवारी रोजी चाचणी नंतर, 26 फेब्रुवारी हा दिवस हल्ल्यासाठी निश्चित करण्यात आला. त्यानंतर अंधाऱ्या रात्री भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश झोपेत असताना, पहाटे 3 वाजता भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी बालकोटवर जवळपास 1000 किलोंचे बॉंब फेकले. या हल्ल्यात ‘जैश’च्या इमारती जमीनदोस्त झाल्या.