Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

दिल्ली पोलिसांचे नागरिकांना आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका;1 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Mar 01, 2020 11:46 PM IST
A+
A-
01 Mar, 23:46 (IST)

दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर येथील परिस्थिती पूर्ववत होत आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्ली पोलीस प्रवक्ता एमएस रंधावा यांनी मीडियासोबत केलेल्या बातचीत मध्ये म्हटले आहे की, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

01 Mar, 22:46 (IST)

जम्मू मधील ऐतिहासिक सिटी चौकाला भारत माता चौकाचे नाव देण्यात आले आहे. 

01 Mar, 21:56 (IST)

मुंबईत सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर बीडसह अन्य ठिकाणी शनिवार पासून सुरु झालेल्या अवकाळी पावसाने झोडपले असून पिकांचे नुकसान झाले आहे. 

01 Mar, 21:19 (IST)

ठाणे येथील एका कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. या दरम्यान राज ठाकरे यांची मुलाखत अमरीश मिश्रा घेत असून राजकरणाला खरं फार चालत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

01 Mar, 21:06 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी चांगला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चेहराही कार्टूनसाठी बेस्ट आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. राज ठाकरे यांची आज ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्रा यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

 

01 Mar, 20:17 (IST)

14 वर्षात अख्खं रामायण घडलं, मात्र आपल्याकडं 14 वर्षात केवळ बांद्रा-वरळी सी लिंक बांधला गेला, अशी टीका मनले अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच  सध्याचं राज्यातील सरकार हे दुर्देवी असून सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

01 Mar, 19:54 (IST)

राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली शहरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.  

 

01 Mar, 19:19 (IST)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्री क्षेत्र शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले.

01 Mar, 18:58 (IST)

आपल्या देशातील महिला आणि समाजाच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उच्च नेत्यापदावरील अधिक महिलांची आवश्यकता असल्याचे सांगत अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरे यांचे सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच जनतेच्या महत्त्वाच्या विषयांवर मत मांडण्यासाठी चांगले व्यासपीठ असल्याचेही अमृता यांनी म्हटले आहे.

01 Mar, 18:06 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला साधू-संतांनी विरोध केला आहे. हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करत 'अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,' अशी धमकी दिली आहे.

Load More

आज, 1  मार्च रोजी मुंबईत प्लास्टिकवर संपूर्ण बंदी (Plastic Ban) आणण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी दिले आहेत, त्यानुसार, कोणीही बंदी योग्य प्लास्टिक वापरताना आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर आजपर्यंत मुंबईतील 16 लाख आस्थापनांना भेटी देऊन 86 हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून सुमारे चार कोटी 65 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. आजपासून होणाऱ्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी नंतर हे आकडे वाढू शकतात.

दुसरीकडे, काल औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत, अंबडला औरंगाबाद शहरात, वाळूज, सिल्लोडसह जवळपासच्या संपूर्ण परिसरात काल अवकाळी पाऊस धडकला आहे. याच प्रमाणे काल पणजी सह गोव्यातील काही भागात सुद्धा पावसाच्या सरी बरसल्या. शनिवारी दुपारपासून उत्तर आणि दक्षिण गोव्यात शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते तर आजही या हलक्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, देश विदेशात बाजार क्षेत्रात बरीच मंदी दिसून येत आहे. मागील साधारण महिन्याभरापासून चीन मधील कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बाजारावर परिणाम झाल्याचे सांगितले जातेय. चीन मध्ये अजूनही कोरोनाचा हाहाकार कमी झालेला नसून करोना विषाणूने शुक्रवारी 47 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 2835 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या आता 79251 झाली आहे.


Show Full Article Share Now