चित्रदुर्ग: सिद्दम्मा नावाच्या 110 वर्षांच्या आजींची कोरोना व्हायरसवर मात; 1 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Aug 01, 2020 11:56 PM IST
आज देशात सर्वत्र ईद-उल-अजहा (Eid Ul Azha) अर्थात बकरी ईद (Bakri Eid) सण उत्सहात साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना लिहिलेल्या पत्रात बांगलादेशाने कोरोना संकटाशी लढण्यासाठी उचललेल्या पावलांची प्रशंसा केली आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात बांगलादेशने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांमध्ये मदतीसाठी भारत सदैव तत्पर राहील, असं आवाहनदेखीर मोदींनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या ट्विट हँडलवरून मुस्लिम बांधवांना 'ईद-उल-अजहा' तथा 'बकरी ईद'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोना संकट लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी 'बकरी ईद' साधेपणानं साजरी करावी. सोशल डिस्टन्सिंग राखावं, सामुहिक नमाज पठण टाळून घरीच नमाज अदा करा. रमजान काळात केलेलं सहकार्य यावेळीही करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
याशिवाय आज थोर समाजसेवक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली जात आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केलं आहे. तर दुसरीकडे मुंबई - दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज राज्यातील विविध भागात आज पहाटेपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.