delhi crime PC ANI

Delhi Double Murder Case: दिल्लीच्या चिराग परिसरात शेजाऱ्यांशी झालेल्या भाडंणात पिता पुत्राची हत्या करण्यात आली आहे. या भयावह घटनेमुळे दिल्ली हादरली आहे. जय भगवान (५५) आणि त्यांच्या मुलगा शुभम भगवान (२२) असं हत्या झालेल्यांचे नाव आहे. दोघे ही केबल कामगार होते. ही घटना रविवारी ८ वाजता चिराग दिल्लीच्या कुम्हार चौकाजवळ ही घटना घडली आहे. हेही वाचा-पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय, पतीकडून माजी सैनिकाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना रात्री आठ वाजता फोन आला आणि सांगितले की कोणीतही दोघांची हत्या केली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंचर दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. मुलाला ४-५ जणांनी भोसकून हत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात डीसीपी अंकित चौहान कारवाई करत आहे.

पोलिसांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हत्येमागील मुख्य कारण पूर्ववैमनस्य असल्याचे दिसून येत आहे."आम्ही गुन्हा दाखल केला आहे, आणि त्याची चौकशी सुरू केली आहे," ते पुढे म्हणाले.या घटनेनंतर परिसरात एकत खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचे समोर आले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.