Rajasthan Man Dies Due To Wrong Blood Transfusion: जयपूरच्या प्रतिष्ठित सवाई मानसिंग (Sawai Man Singh) (एसएमएस) रुग्णालयात घोर निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढवण्यात आले. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बांदीकुई शहरातील रहिवासी 23 वर्षीय सचिन शर्मा यांचा कोटपुतली शहरात अपघात झाला होता. या अपघातात सचिन गंभीर जखमी झाला होता. यानंतर सचिनला जयपूर येथील सरकारी सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक अचल शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. तपास अहवालानुसार कारवाई केली जाईल. या प्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, चुकीच्या रक्तसंक्रमणामुळे रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आले. परंतु, रुग्णाची प्रकृती सतत खालावत गेली. (हेही वाचा - ‘महत्त्वाच्या अवयवांवर 4 वेळा वार करणे म्हणजे खून’; न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून 34 वर्षीय व्यक्तीला दिली जन्मठेपेची शिक्षा)
दरम्यान, या अपघातात सचिनला गंभीप दुखापत झाली होती. तसेच यात त्याला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. यानंतर डॉक्टरांनी सचिनला रक्त चढवण्यास सांगितले. सचिनला एबी पॉझिटिव्ह रक्त हवे होते, मात्र वॉर्ड बॉयने त्याला दुसऱ्या रुग्णाचे ओ पॉझिटिव्ह रक्त दिले. सचिनला AB+ ऐवजी O+ रक्त देण्यात आले. त्यामुळे त्याची प्रकृती जास्त बिघडू लागली. (Lasya Nanditha Died: MLA लस्या नंदिता यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, भरधाव कारचं नियत्रंण सुटल्याने घात)
सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल सचिन शर्मा यांचे आज निधन झाले. या संपूर्ण प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सवाईमान सिंह रुग्णालयाचे अधीक्षक राजीव बगरट्टा यांनी सांगितले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. कालच ही बाब उघडकीस आली, आम्ही चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. सर्व विषयांची चौकशी सुरू आहे. आम्ही काही तासांत अहवाल सादर करू.