NEET PG Exam 2021: पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा 11 सप्टेंबरला होणार, सविस्तर माहिती घ्या जाणून
Representational Image | (Photo Credits: Unsplash.com)

NEET PG 2021 Exam Date: नीट पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया (Mansukh Mandaviya) यांनी मोठी घोषणा केली आहे. एमडी, एमएस किंवा पदव्युत्तर पदविका अर्थात पीजी डिप्लोमा अशा अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा 11 सप्टेंबरला घेतली जाणार असल्याचे जाहीर झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक परीक्षा रद्द किंवा लांबणीवर पडल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर मनसुख मांडवीय केलेल्या या घोषणेमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.

मनसुख मांडवीया यांनी नुकताच केलेल्या ट्वीटमध्ये असे लिहले आहे की, नीट पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा 11 सप्टेंबर 2021 रोजी घेण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. एनईईटी यूजीची परीक्षा पदव्युत्तर कोर्सेससाठी केली जात आहे, तसेच एनईईटी पीजी परीक्षा उतीर्ण करून उमेदवार एमडी किंवा एमएस आणि डिप्लोमाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. हे देखील वाचा-BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा बलात SI, ASI आणि कॉन्स्टेबल पदासाठी नोकर भरती, अर्ज 26 जुलै पर्यंत करता येणार

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे ट्वीट-

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी एनईईटी पीजी अर्थात पदवी प्रवेशासाठीची परीक्षा 12 सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा केली होती. आज (13 जुलै) संध्याकाळी 5 वाजल्यापासून या परीक्षेचे अर्ज देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतर आता एनईईटी पीजीची देखील घोषणा करण्यात आली आहे.