Navjot Singh Sidhu (PC - ANI)

Road Rage Case: पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी 1988 च्या रोड रेज प्रकरणात (Road Rage Case) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. याला उत्तर देताना न्यायालयाने त्यांना हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवण्यास सांगितले. नवज्योतसिंग सिद्धूच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आत्मसमर्पण करण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धू यांच्या प्रकृतीचे कारण यासाठी देण्यात आले आहे. सिद्धूच्या या याचिकेला पंजाब सरकारने विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धूच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांना काही आठवड्यांची मुदत देण्यात यावी, असे म्हटले आहे. त्यानंतर ते न्यायालयात आत्मसमर्पण करणार आहेत.

नवज्योत सिंग सिद्धू यांचे समर्थक शेरी रियार यांनी माध्यमांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ढासळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच्या यकृतात समस्या होती, ती मोठ्या कष्टाने बरी झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी प्रकृतीचे कारण देत न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. (हेही वाचा - CBI Raids Lalu Yadav: लालू प्रसाद यादव यांच्या 17 ठिकाणांवर सीबीआयचे छापे; भ्रष्टाचाराचा आरोप)

न्यायालयाने त्यांना वेळ दिला आहे की, नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. पतियाळा येथे त्यांच्या वकिलाने सांगितले की, सिद्धू उशिराने आत्मसमर्पण करतील. त्यांच्याकडे आता पर्याय असल्याचे अधिवक्ता एचपीएस वर्मा यांनी सांगितले. सिद्धू यांच्याशी चर्चा केल्यानंतर वकील घराबाहेर पडले आहेत. सध्या सिद्धू घरी जवळच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. सिद्धू आज क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दिलासा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मिळत आहे. सिद्धूचे वकीलही पटियाला कोर्टात पोहोचले आहेत.

पटियाला कोर्टात शरणागती पत्करण्यासाठी सिद्धू किती वाजता घरातून बाहेर पडतील, हे स्पष्ट झालेले नाही. सिद्धूचे वकील पतियाळा ते चंदीगडपर्यंत कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, सिद्धू यांच्या घरापासून ते पटियाला न्यायालय परिसराबाहेर त्यांचे समर्थक जमा होत आहेत. सिद्धूला पाठिंबा देणारे अनेक काँग्रेस नेते त्यांच्या घरी पोहोचले आहेत.