
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत विवाहवाह्य संबधातून एका माजी पोलीसाला हाताशी धरुन एका पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळलेल्या पत्नीने मुलाला हाताशी धरुन पतीला झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून त्याची हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबईतील उलवे इथं घडली आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर असलेला माजी पोलीस कर्मचारी, एक रिक्षा चालक आणि आरोपी महिलेचा अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. महिलेने पती गायब झाल्याचा बनाव करून हा कट रचला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण:
रेश्माने पतीकडे घटस्फोट मागितला होता. पण तो देण्यास तयार नव्हते. दरम्यान, रेश्मा हिचे मुंबई पोलीसात कामाला असलेल्या रोहित टेमकर याच्याबरोबर जुळले होते. विवाहबाह्य संबंधात काटा ठरत असलेल्या पतीची रेश्मा आणि रोहितने गळा आवळून हत्या केली. रोहितचा मित्र असलेल्या प्रथमेश म्हात्रे याची रिक्षा बोलावण्यात आली. त्या रिक्षात सचिनचा गळा ओढणीने आवळून खून करण्यात आला. त्यानंतर पत्नी रेश्मा हीने पोलिसात सचिन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पण ज्यावेळी सचिनचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला त्यावेळी त्याचा खून झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. संपूर्ण कट समोर आल्यानंतर पोलिसांनी रेश्मा, रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे आणि सिंधुदुर्गातून रोहित यालाअटक केली आहे.