Baba Tarsem Singh Murder Video: नानकमत्ता गुरुद्वारा कार सेवा प्रमुख बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ
Baba Tarsem Singh Murder Video (PC - @SachinGuptaUP)

Baba Tarsem Singh Murder Video: उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नानकमत्ता गुरुद्वारा कार सेवा प्रमुख (Nanakmatta Gurudwara Kar Sewa Pramukh) बाबा तरसेम सिंग (Baba Tarsem Singh) यांची उधम सिंग नगर येथील गुरुद्वारात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून हल्लेखोराचा शोध सुरू केला. दरम्यान, डीआयजी योगेंद्र रावत यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कार सेवा डेरा प्रमुख नानकमत्ता बाबा तरसेम सिंग (वय, 60) यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी तरसेम सिंग यांना उपचारासाठी खातिमा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याचा मृत्यू झाला. तरसेम सिंग यांना पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी झाली होती. (हेही वाचा -Abhishek Ghosalkar Murder Case : 'अभिषेक यांच्याबरोबर मलाही मारण्याचा मॉरिसचा कट होता'; पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचा दावा)

हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच हल्लेखोराच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. तरसेम सिंगला तीन सेकंदात हल्लेखोरांनी दोन वेळा गोळ्या घातल्या. हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. (वाचा - Delhi Double Murder Case: दिल्लीत पूर्ववैमनस्यातून शेजारच्यांनी केली पिता पुत्राची हत्या, गुन्हा दाखल)

एसएसपी मंजुनाथ टीसी यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तरसेम सिंग यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी टीम तयार करण्यात आली आहे.