नोएडामध्ये मुस्लिम बांधवांना पार्कमध्ये नमाज पठणाला बंदी, पोलिसांचे आदेश

नोएडामध्ये मुस्लिम बांधवांना पार्कमध्ये नमाज पठणाला बंदी घालण्यात आली आहे. या बाबतीत पोलिसांनी तेथील मुस्लिम नागरिकांना आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशात असलेल्या सेक्टर 58 येथे असलेल्या एका पार्कमध्ये काही मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी यायचे. त्यानंतर नमाज पठण करणाऱ्या वक्तींची संख्या दिवागणीक वाढत गेली. त्यामुळेच पार्कमध्ये फेरफटका मारण्यास येणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

मात्र पार्क असलेल्या परिसरात कार्यालये आहेत. त्यामुळे मुस्लिम कर्मचाऱ्यांना प्रत्येक शुक्रवारी नमाज पठणासाठी तेथे येतात.पोलिसांनी मुस्लिम बांधवांना नकार देत कार्यालयाच्या मालकांनासुद्धा याबबात आदेश देण्यात आले आहेत. तर 19 डिसेंबरला या पार्कमध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी नौमान अख्तर यांच्या सोबत दोन जणांना अटक करण्यात आली होती. परंतु त्यांची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली.