Photo credits: Pixabay

Death Due to ‘Oxygen Deficiency’: लडाखमधील एका घटनेत उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. लडाखमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे(,Oxygen Deficiency) हा मृत्यू झाला. मृत्यूची ही घटना गुरुवारी 30 ऑगस्ट रोजी लडाखच्या (Ladakh)लेहमध्ये घडली. चिन्मय शर्मा असे 27 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. तो सोलो बाईक ट्रिपवर गेला होता. मात्र, त्याला अचानक ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आणि यात त्याचा मृत्यू झाला. (Air Travel: जेट इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण, विमान तिकीटांचे दर घसरण्याची शक्यता)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,चिन्मय शर्मा हा तरुण नोएडा येथील एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत काम करत होता. गुरुवारी, 22 ऑगस्ट रोजी शर्मा यांनी लडाखमध्ये सोलो बाईक ट्रिपला सुरुवात केली. त्यानंतर चार दिवसांनी शर्मा यांनी त्यांचे वडील पराग शर्मा यांना त्यांच्या डोकेदुखीबद्दल माहिती दिली. त्याच्या वडिलांनी त्याला विश्रांती आणि वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. दोन दिवसानंतर शर्माने पुन्हा एकदा त्याच्या पालकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याबद्दल सांगितले.

यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या मदतीने चिन्मयला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचे पालक लेहला पोहोचण्याच्या काही तास आधी गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्माच्या पालकांना सांगितले की चिन्मयचा मृत्यू उंच ठिकाणी कमी ऑक्सिजनमुळे झाला.