... म्हणून मुस्लिम इसमाने बदलला धर्म
भगवा झेंडा ( फोटो सौजन्य- Pixabay)

उत्तर प्रदेशातील शामली येथे राहणाऱ्या एका मुस्लिम इसमाने आपले धर्मपरिवर्तन केले आहे. तसेच त्याला पडणाऱ्या या स्वप्नामुळे त्याने धर्मपरिवर्तन केल्याचे सांगितले आहे.

शहजाद असे या इसमाचे नाव आहे. तो मुळ मुस्लिम धर्म परंपरेचे आयुष्य जगत होता. मात्र त्याला रोज रात्री पडणाऱ्या स्वप्नामध्ये भगवान श्री राम दिसत असल्याने शहजाद याने त्याच्या परिवारासमवेत धर्म बदलला आहे. तसेच स्वप्नात श्री रामांनीच त्याला धर्म बदलण्यास सांगितले असल्याचा दावा शहजादने केला आहे. धर्मांतरानंतर रामाच्या नावाच्या घोषणा करत देवळात जाऊन परिवारासह रामाचे पाठपूजन केले आहे.

धर्म बदलाच्या वेळी डीएम ऑफिस अधिकाऱ्यांनी याबद्दल विचारले असता, 'माझे पूर्वज हिंदू धर्माचे होते. मात्र त्यांना काही लोकांनी जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले असल्याचे शहजादने सांगितले आहे'.