Gurugram Shocker: एग करी बनवण्यास नकार दिल्याने लिव्ह-इन पार्टनरची हातोड्याने मारहाण करून हत्या; गुरुग्राममधील हृदयद्रावक घटना
Egg curry (PC - Wikimedia Commons)

Gurugram Shocker: गुरुग्राम (Gurugram) मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनर (Live-in Partner) ची हत्या (Murder) केली आहे. हत्येचे कारण ऐकून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, लिव्ह-इन पार्टनरने आरोपीच्या विनंतीनुसार एग करी बनवण्यास नकार दिला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम पोलिसांना चौमा गावात एका बांधकाम सुरू असलेल्या घरात एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. लल्लन यादव (वय, 35) असं आरोपीचं नाव आहे. आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, जेव्हा महिलेने त्याच्यासाठी अंडा करी बनवण्यास नकार दिला तेव्हा त्याने दारूच्या नशेत तिला हातोड्याने आणि बेल्टने मारहाण केली. साबिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील औरही गावात राहणाऱ्या आरोपीला पालम विहार पोलिस स्टेशनच्या पथकाने दिल्लीतील सराय काले खान परिसरातून अटक केली. (हेही वाचा -Mob Attacks Foreign Students: गुजरात विद्यापीठात रमजान तरावीहची नमाज अदा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला, पहा व्हिडिओ)

मृत महिलेचं नाव अंजली (वय, 32) असं आहे. अंजली रॅगपिकर बुधवारी चौमा गावात एका बांधकामाधीन इमारतीत मृतावस्थेत आढळून आली. मृतदेह पाहिल्यानंतर इमारतीच्या केअरटेकरने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि अंजली यांना 10 मार्च रोजी गुरुग्राम बसस्थानकावरून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काम करण्यासाठी आणले होते. इमारत मालकाने त्यांची नाव, पत्ते आणि ओळखपत्रही घेतले नाहीत. आरोपीने अंजलीला पत्नी म्हणून सांगितले होते. (हेही वाचा - Bengaluru Accident Video: बीएमटीसी बसच्या धडकेने एकाचा मृत्यू, मन विचलित करणारा Video आला समोर)

चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याच्या पत्नीचा सहा वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता आणि त्यानंतर तो दिल्लीला आला होता. सुमारे सात महिन्यांपूर्वी आरोपी कचरा वेचक अंजलीला भेटला होता. दोघेही मजूर म्हणून एकत्र राहू लागले. पालम विहारचे एसीपी नवीन कुमार यांनी सांगितले की, अंजलीची हत्या करून आरोपी फरार झाला होता. आम्ही हत्येत वापरलेला हातोडा आणि बेल्ट जप्त केला असून आरोपींची चौकशी करत आहोत.