Anil Bhalla Passes Away: पाकिस्तान विरुद्ध 1971 च्या युद्धात महत्वाची भुमिका बजावणारी स्क्वॉड्रन लीडर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. अनिल भल्ला यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. परंतु, युद्धाच्या मैदानात पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या अनिल भल्ला यांचा कोरोनाविरुद्ध लढा अपयशी ठरला आहे. अनिल भल्ला हे 74 वर्षाचे असून ते मूळचे मुंबईचे होते. महत्वाचे म्हणजे, 1984 साली भारतीय वायुसेनेतून रजा घेतल्यानंतर ते हैदराबादमध्ये वास्तव्यास होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
अनिल भल्ला यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील सैनिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर, भल्ला राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 32 व्या अभ्यासक्रमात सामील झाले. त्यानंतर 1968 मध्ये भारतीय हवाई दलाचा लढाऊ वैमानिक बनले. तसेच अनिल भल्ला हे तेजपूर येथील 28 व्या पथकाचे भाग होते. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध 1971 साली झालेल्या युद्धात अनेक उड्डाणे घेतली आहेत. त्यावेळी ढाकामधील राज्यपाल सभागृहासह इतर अनेक तळांचा बचाव केला. एवढेच नव्हेतर, पाकिस्तानने शरणागती स्वीकारली त्यात अनिल भल्ला यांची महत्वाची भूमिका होती, असे त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले आहे. हे देखील वाचा- Covid-19 Vaccination Campaign: लसीकरण मोहिमेवरून राजकारण तापलं; CoWIN पोर्टलऐवजी राज्य सरकारला बनवायचे आहे स्वतःचे अॅप
स्क्वॉड्रन लीडर भल्ला हा मास्टर ग्रीन आयआर (इन्स्ट्रुमेंट रेटिंग) मिळविणारे सर्वात युवा अधिकारी होते. आयआर सर्वोत्कृष्ट वैमानिकांना दिला जातो. ते हाकीमपेटमधील लढाऊ वैमानिकांच्या प्रशिक्षण शाखेचे प्रशिक्षकही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.