Earthquake In Uttarakhand: उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे अनेक सौम्य धक्के; सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही
Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake In Uttarakhand: उत्तरकाशी (Uttarkashi) मध्ये शनिवारी रात्री उशिरा पाच वेळा भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. मात्र, जिल्ह्यातील सर्वच तहसील परिसरातून नुकसान झाल्याची माहिती नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 12:45 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.5 इतकी होती. ज्याचे केंद्र भटवाडी तहसील अंतर्गत सिरोरच्या जंगलात असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या वतीने सर्व तहसीलमधून सतत फोनवरून माहिती संकलित करण्यात येत आहे. भूकंपाचे स्वरूप सौम्य असल्याने स्थानिक पातळीवर त्याची नोंद होऊ शकली नाही. भूकंपाच्या केंद्राविषयी माहितीसाठी आयएमडीशी संपर्क साधला जात आहे.

दुसरीकडे, उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घरातून बाहेर आले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी 12.39 ते 1.15 च्या दरम्यान हे धक्के जाणवले. पहिला हादरा 12:39, दुसरा 12:45 आणि तिसरा 01:01 वाजता जाणवला.

दरम्यान, उत्तरकाशी शहरात ठिकठिकाणी लोक लहान मुलांसोबत बसलेले दिसले. उत्तरकाशी जिल्हा भूकंपाच्या दृष्टिकोनातून झोन 5 अंतर्गत येतो. आमच्याकडे उत्तराखंडमध्ये 18 सिस्मोग्राफ स्टेशनचे मजबूत नेटवर्क आहे. उत्तराखंडसह हिमाचल आणि नेपाळचा पश्चिम भाग यामधील भूकंपीय अंतर म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाला कधीही भूकंप होण्याची शक्यता आहे, असे एका शास्त्रज्ञाने सांगितले.