MP: मध्य प्रदेशातील सागर येथे 32 वर्षीय महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत देह त्यांच्या घरी आढळून आला आहे. त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला आणि तिच्या मुली मंगळवारी रात्री सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील नेपाळ पॅलेस परिसरात त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना आणि तिच्या मुली अवंतिका (आठ) आणि अन्विका (तीन) अशी मृतांची नावे आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) संजीव उईके म्हणाले, “वंदना पती विशेष पटेल आणि तिच्या दोन मुलींसोबत नेपाळ पॅलेस परिसरात राहत होती. मंगळवारी रात्री वंदना आणि तिच्या एका मुलीचा मृतदेह स्वयंपाकघरात, तर लहान मुलीचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला.
ते म्हणाले, "प्राथमिकदृष्ट्या हा हत्येचा गुन्हा आहे आणि याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे." वंदना यांचे पती जिल्हा रुग्णालयात काम करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.