धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या मुलाकडून घरी झोपलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Latestly/Illustration)

घरात झोपलेल्या एका 13 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या मुलाने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या पीडित मुलीसोबत ही घटना दुसऱ्यांदा घडून आल्याचे सत्य समोर आले आहे.

फरीदाबाद येथे राहणाऱ्या मुलीचे शेजारी राहणाऱ्या मुलाने अपहरण केले. तसेच ही मुलगी झोपली असताना त्याने हा प्रकार केला आहे. मुलीचे अपहरण करताना तिने आरडाओरड करु नये म्हणून तिच्या तोंडात कपडा कोंबला. तसेच तिला एका गाडीतून घेऊन गेले. तर त्या गाडीतच या चार नराधमांनी तिच्यावर रात्रभर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.  मात्र या प्रकरणातील आरोपींनी सकाळी मुलीला तिच्या घराजवळ फेकून देऊन पळ काढला आहे.

या पीडित मुलीने कसेबसे घरी जात तिच्या घरातील मंडळींना घडेलेल्या प्रकरणाची हकीकत सांगितली. तेव्हा घरातील मंडळींनी तातडीने पोलिसात तक्रार केली आहे. तसेच मुलीची प्रकृती गंभीर असून तिला मानसिक धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.