Kartik Purnima 2019: कार्तिक पौर्णिमेनिमित्त अयोध्येत लाखो भाविकांची गर्दी
भूपेश बघेल अयोध्या येते स्नान करताना (PC - Twitter)

Kartik Purnima 2019: आज संपूर्ण देशभरात कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) आणि देव दिवाळीचा (Dev Diwali) सण साजरा होत आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त अयोध्या ( Ayodhya) येथे शरयू नदीत स्नान करण्यासाठी लाखो भक्त दाखल झाले आहेत. अयोध्येतील राम की पायडी आणि नया घाट येथे स्नान करण्यासाठी ५ लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, अयोध्येचे दंडाधिकारी अनुज कुमार झा यांनी सांगितलं की, इतर सणांपेक्षा यंदा रामजन्मभूमी निकालामुळे कार्तिक पौर्णिमेनिमित्त जास्त भाविक अयोध्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने राम जन्मभूमी परिसरात परिस्थिती सुरळीत राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलीस अधिकारी व दंडाधिकारी यांना तैनात करण्यात आले आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेस बघेल अयोध्या येथे पवित्र स्नान करताना भाविक - 

दरम्यान, अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य, स्वच्छतागृहे तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी २० वैद्यकीय शिबिर, १८ पाण्याचे टँकर आणि ३० फिरती स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी शरयू नदीत स्नान करण्यासाठी सुरूवात झाली असून मंगळवारी सायंकाळीपर्यंत स्नान करण्यास मुहूर्त आहे. आज सर्वत्र कार्तिक पौर्णिमा तसेच देव दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे.

हेही वाचा - Kartik Purnima 2019 Shubh Muhurat: कार्तिक पौर्णिमेचा दिवस असतो शुभ, जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहूर्त

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वादग्रस्त जमिनीप्रकरणी अंतिम निर्णय जाहीर केला. या प्रकरणात हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांच्यावतीने युक्तीवाद करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, वादग्रस्त भाग रामलल्लांचा तर मशिदीसाठी अयोद्धेत 5 एकर जागा देण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.