Noida Crime: सासरच्या मंडळीकडून विवाहित महिलेला बेदम मारहाण, घटनेत पीडितेचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना
Representational image (Photo Credit- IANS)

Noida Crime: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका विवाहित महिलेला सासरच्या मंडळींना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. पीडित महिलेकडून सासरच्या कुटुंबियांनी 21 लाख रुपये रोख आणि टोयोटा फॉर्च्युनर कारची मागणी केली होती. परंतु ते माहेरच्या कुटुंबियांना जमले नाही त्यामुळे तीची मारहाण करत हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. (हेही वाचा- जेएनयूमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार,

मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा असं मृत महिलेचे नाव आहे. तीचा पती विकास आणि त्याचे आई वडिल करिश्माला मारहाण करायचे अशी माहिती करिश्माच्या भावाने पोलिसांना दिली. दिपक (करिश्माचा भाऊ) तीला भेटण्यासाठी सासरच्या घरी गेला होता त्यावेळी तीच्या बहिणीचा मृतदेह घरात आढळला होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी करिश्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अहवालानुसार, करिश्माचा मृत्यू भरपूर मारहाण केल्यामुळे झाला.त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तीचा मृत्यू झाला.पोलिसांना दिपकने सांगितले की, विकास आणि करिश्माचा काही वर्षांपूर्वीच लग्न झालं होते.त्यावेळी हुंडा म्हणून ११ लाख रुपयांच सोनं, एक कार आणि रोख रक्कम दिली होती. तरीही तीच्या सासरच्या मंडळीकडून हुंड्याची मागणी सुरुच होती. तिच्यावर अनेकदा शारिरिक आणि मानसिक छळ सासरच्या मंडळीकडून होत होती. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.