देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांचा रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' (Mann Ki Baat) मधून देशातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. येत्या 28 जूनला नरेंद्र मोदी 'मन की बात' च्या 66 व्या एपिसोडच्या माध्यमातून जनतेच्या समोर येणार आहेत. हा रेडिओ कार्यक्रम पहिल्यांचा 3 ऑक्टोंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आला होता. त्यावेळी पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सत्तेत आले होते. मन की बातसाठी नागरिकांनी त्यांच्या काही महत्वाच्या सूचना असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 येथे रेकॉर्ड करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच MyGov फोरम किंवा NaMo अॅपवर सुद्धा त्यांच्या आयडियाज शेअर करता येणार आहेत.
यापूर्वीच्या मन की बातच्या 65 व्या एपिसोड मधून नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत असे म्हटले की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मन की बात मधून संवाद साधण्यात आला. गेल्या मन की बातच्या वेळी पॅसेंजर ट्रेन, बस, विमान सेवा पूर्णपणे बंद होत्या. यानंतर काही गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. पीएम मोदी यांनी असे म्हटले की, सावधगिरी बाळगत विमान सेवा सुरु करण्यात आले आहे. तसेच उद्योगधंदे सुरु झाले. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा हिस्सा आता सुरु झाला असून नागरिकांनी पूर्वीपेक्षा आता अधिक सर्तक राहिले पाहिजे.(16 आणि 17 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद; घेणार कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा)
इस महीने की 28 तारीख़ को प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी देशवासियों के संग अपने "मन की बात" सांझा करेंगें।
"मन की बात" के लिए आप अपने बहुमूल्य सुझाव, टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड करा सकते हैं।
या फिर, MyGov फोरम पर या NaMo एप पर भी लिख सकते हैं।#MannKiBaat pic.twitter.com/yNEhHnHkar
— Mann Ki Baat Updates (@mannkibaat) June 13, 2020
पीएम मोदी यांनी म्हटले होते की, देशातील सर्वजण कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपली जनसंख्या अन्य देशांपेक्षा काही पटींने सर्वाधिक आहे. परंतु तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य देशांपेक्षा कमी प्रमाणात परसरला आहे. कोरोना व्हायरसमुळे बळींचा आकडा देशात कमी आहे. जे काही नुकसान झाले आहे त्याचे दु:ख सर्वांना आहे. परंतु जे काही आपण वाचवू शकलो आहे ते निश्चितपणे देशाच्या सामूहिक निर्धार शक्तीचा परिणाम आहे.