तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मयिलादुथुरै जिल्ह्यात (Mayiladuthurai district) एका अल्पवयीन मुलीवर एका 25 वर्षीय व्यक्तीने बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीचा मृतदेह (Deadbody) जवळपास एका आठवड्यापूर्वी एका गावातील ड्रेनेज कालव्यात सापडला होता. शवविच्छेदन अहवालात 13 वर्षीय मुलीला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा झाल्याचे स्पष्ट झाले. प्रभाकर असे आरोपीचे नाव आहे. वृत्तानुसार मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. मुलगी बेपत्ता झाल्यावर सुरुवातीला प्रभाकरला मित्र आणि कुटुंबीयांनी शोधून काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या हालचालींमुळे संशय निर्माण झाला होता.
कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी प्रभाकरला बोलते केले. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितले की आरोपीईने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि नंतर कपड्याने गळा दाबून तिची हत्या केली. आरोपीनी मुलीचा मृतदेह ड्रेनेज कालव्यात फेकून दिला. हेही वाचा Hyderabad Gangrape Case: हैदराबादमध्ये 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार, फरार आरोपींचा शोध सुरू
आरोपीनी मुलीला इतर मुलांकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याने दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रभाकरने मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. प्रभाकरवर लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.