कर्नाटकातील (Karnataka) हसन (Hasan) जिल्ह्यात एका स्थानिक न्यायालयात शनिवारी मध्यस्थीच्या बैठकीत जोडपे उपस्थित राहिल्यानंतर एका 24 वर्षीय महिलेला तिच्या पतीने भोसकले, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. बेंगळुरूमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या 32 वर्षीय शिवकुमारने घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे मान्य केल्यानंतर काही वेळातच चैत्राची न्यायालयाच्या आवारात हत्या (Murder) केली. हत्या त्याच दिवशी घडली ज्या दिवशी तोडगा निघाला होता. त्यांना दोन मुले असल्याने त्यांच्यात बोलणी सुरू होती. हेही वाचा Mumbai: नगरसेविकेला 'बाहुली' म्हणणे बीएमसीच्या अधिकाऱ्याला पडले महागात; न्यायालयाने सुनावली 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
एकत्र राहणे किंवा पुरेशी सेटलमेंट रक्कम देणे चांगले आहे, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोघांनीही होकार दिला आणि पतीने बाहेर येऊन गुन्हा केला, हसनचे पोलिस अधीक्षक हरी राम शंकर यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याला सहा आणि चार वर्षांची दोन लहान मुले आहेत. शिवकुमारने गुन्ह्यानंतर आत्मसमर्पण केले आणि पोलिसांनी त्याला अटक केली.