बिहार: हुंड्यात बुलेट दिली नाही म्हणून पतीने मित्रांना पत्नीवर करण्यास सांगितला सामूहिक बलात्कार; स्वत: केला व्हिडिओ शूट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिसव वाढ होत आहे. बिहारमधील (Bihar) बैरिया गावात अतिशय लाजिरवाणा प्रकार घडला आहे. हुंड्यात (Dowry) बुलेट (Bullet Motorcycle) दिली नाही म्हणून चक्क पतीने मित्रांना पत्नीवर बलात्कार (Gang rape) करण्यास सांगत स्वत: या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. विशेष म्हणजे या नराधम पतीने पत्नीला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला आहे. त्यानंतर बैरिया पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पीडितेने 30 नोव्हेंबर 2017 मध्ये एका मुलीला जन्म दिला. नराधम पतीने सप्टेंबर 2018 मध्ये पीडितेला तिच्या माहेरी जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या आई-वडीलांना सांगितला. (हेही वाचा - बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल)

दरम्यान, 27 डिसेंबर 2014 ला पीडित महिलेचा मुस्लिम पद्धतीने आरोपीसोबत विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसातचं पती मारहाण आणि छळ करू लागला. नराधम पती पत्नीस तिच्या घरच्याकडून बुलेट आणण्यासाठी मारहाण करू लागला. तसेच जेव्हा बुलेट मिळेल तेव्हाच पीडितेला आपल्या सोबत ठेवेन, अशी धमकीही नराधन पतीने पीडितेला दिली. त्यानंतर पीडितेचा पती दोन महिन्यासाठी बाहेर गेला.

त्यानंतर 16 नोव्हेंबर 2016 ला मित्राच्या घरी पार्टी आहे, असे म्हणून पीडित पत्नीला घेऊन गेला. येथे त्याच्या 4 मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी पीडितेच्या पतीने या सर्व घटनेचं व्हिडिओ शूटिंग केलं. तसेच पीडितेला या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यानंतर पीडित महिला माहेरी आल्यानंतर तिने बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात अर्ज केला. त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या पती विरोधात आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चार नराधमांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.