बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल
बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भावेर्यात अडकलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. आपल्या विरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द करा, अशी विनंती करत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भावेर्यात अडकलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. आपल्या विरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द करा, अशी विनंती करत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. येत्या 9 मार्चला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका नगरसेविकाने 27 फेब्रुवारी रोजी मेहतांच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत मीरा-भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित नगरसेविकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर महेता यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता असल्याने मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
पीडाताने तक्रारीत म्हटले आहे की, नरेंद्री मेहता यांच्यापासून त्याच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, असाही आरोप पीडिताने केला आहे. 2014 सालानंतर याप्रकरणी आपण नरेंद्र मेहतांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मेहतांची जवळीक असल्याने ते आपल्यावर दबाव टाकत होते. त्यामुळे आजवर तक्रार दाखल करता आली नाही, असा दावा पीडित नगरसेविकेने केला आहे. पीडित नगरसेविकेने याबाबत सुरुवातीला पोलिसात न जाता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर हा प्रकार घातला होता. मात्र, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पीडिताने मीरा-भाईंदर पोलिस ठाण्यात जाऊन मेहतांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मेहतांना अटकेची शक्यता असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी विनंती याचिका दाखल केली आहे. हे देखील वाचा- पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरोपी नीरव मोदी याच्या संपत्तीचा लिलाव थांबवण्यासाठी मुलाची बॉम्बे कोर्टात धाव
दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्यावरील गंभीर आरोप यापूर्वी विधानभवनात देखील चर्चेचा मुद्दा ठरला होता. संबंधित पीडित महिलेने नरेंद्र मेहतांकडून शोषण होत असल्याची तक्रार 2016 मध्ये आणि जुलै 2019 मध्ये अशी दोनवेळा केली होती. त्यानंतरही पोलिसांनी मेहता यांच्यावर पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल शिवसेना नेत्या नीलम गोर्हे यांच्याकडून उचलण्यात आला होता. तर मनीषा कायंदे यांनी देखील या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेत महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2020 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

