Madya Pradesh Shocker: प्रियकरासोबत राहण्याच्या हट्टाला पेटली, थेट टॉवरवर चढली, मध्यप्रदेशातील विवाहीत महिलेचे कृत्य

Madya Pradesh Shocker:  चित्रपटात दाखवले जाणारे स्टंट काही लोक तसचं करून पाहातात. पण ते कधी जीवावर बेतू शकत याची त्यांना कल्पना नसते. तसचं काहीस चित्र मध्य प्रदेशातील शिवापूर जिल्ह्यात पाहायला मिळालं आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरा सोबत राहण्याची घरात मागणी केली असताना घरच्यांनी या गोष्टीला  विरोध केला. विरोध केल्याप्रकरणी या महिलेने शोले चित्रपटातला सीन बनवला. चक्क ही महिला गावातील पॉवर हाऊसच्या टॉवर चढली. तिने प्रियकरासोबत लग्नाची मागणी करत खाली उतरण्यास नकार दिला.

नेमंक काय आहे प्रकरण

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहीत महिलेला दोन आपत्य आहे. महिलेला तिच्या प्रियकरासोबत राहायच होतं अशी मागणी घरांसमोर मांडली. दरम्यान कुटूंबातील सदस्याने तील नकार दिला. घराच्यांनी विरोध केल्याप्रकरणी तीनं गावातील नरवार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पान घाटा पॉवर हाऊसजवळीस  पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढली. हे पाहून गाववरीही चक्रावले आहेत.  हे प्रकरण गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीसाच खबर दिली. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी तीची विनंती केली.  मात्र जो पर्यंत तिच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत महिलेने खाली येण्यास नकार दिला. एवढेच नाही तर तिने तिच्या प्रियकराला घटनास्थळी बोलावण्याचा आग्रह देखील धरला.

तिच्या नकारामुळे पोलिसांनी एनडीआरएफ पथकाला कळवले. ही विवाहीत महिला सकाळी 7.30 च्या सुमारास पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढली होती. बराच वेळ समजूत घातल्यानंतर अखेर सकाळी 10.30 च्या सुमारास ती टॉवरवरून खाली उतरली.