
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांनी चुकून कीटकनाशक प्राशान केल्याने यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन वर्षाचा आणि पाच वर्षाच्या मुलांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. आई मंगळवारी दुपारी शेतात कांदा कापत असताना ही घटना घडली. शेतात महिलेच्या दोन मुले खेळत होत्या, मुलांनी चुकून कीटकनाशक औषध प्यायले आणि ते बेशुध्द झाले. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा विचार करताच आईने देखील कीटकनाशत औषध प्राशान केले.
मिळालेल्या माहितीनुसार,पेटीसिया पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी होते. पूनम (५) आणि चिकी (३) या दोघी जण शेतात खेळत होत्या. पूनम असं मुलींच्या आईचे नाव आहे. कांदा पीक काढण्यासाठी शेतात होत्या. यावेळी दोन्ही मुली शेताच्या कड्यावर बसून खेळत होत्या. त्यानंतर खेळता खेळता मुलांनी पिकांवर फवारणी केल्यानंतर तेथे ठेवलेले कीटकनाशक प्याले आणि दोघेही बेशुद्ध झाले.