देशात महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) येथून सर्वांना हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. भोपाळच्या नाझीराबाद (Nazirabad) परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने नाझीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित आहे. तर, आरोपी हा पीडित महिलेचा नातेवाईक असून त्यांच्या शेजारी राहतो. दरम्यान, गुरुवारी (16 जून) रोजी पीडित महिला घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेत आरोपी त्यांच्या घरात शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने शुक्रवारी (17 जून) या कुटुंबातील सदस्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर पीडिताच्या नातेवाईकांनी ताबडतोब नाझीराबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तिच्यासोबत घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृ़त्त दिले आहे. हे देखील वाचा- Social Media Fraud: फेसबुकवर मैत्री केल्यानंतर महिलेला घातला 2.5 कोटी रुपयांचा गंडा
एसएचओ नाझीराबाद बी.पी.सिंह बैन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. महत्वाचे म्हणजे, आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आरोपीचे वास्तविक वय शोधण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया चालू आहे. या घटनेवर सर्वत्र संतापजनक वातावरण पाहायला मिळत आहे.