Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील महू येथे हाऊसिंग बोर्ड कॉलनीत एका 13 वर्षीय मुलाचा व्हॅनने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. पिथमपूर पोलिस स्टेशनला या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. गुरुवारी मुलगा शाळेतून घरी जात असताना ही घटना घडली. कॉलनीतील दुकानांजवळून तो मुख्य रस्त्यावरून जात असताना एका स्थानिक शाळेच्या व्हॅनने त्याला मागून धडक दिली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी जखमी मुलाला महू येथील खासगी येथील रुग्णालयात दाखल केलं. नागरिकांनी त्याच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. (हेही वाचा- पुणे मुंबई मार्गावर ट्रकने धडक दिल्याने बस कंडक्टराचा जागीच मृत्यू

पालकांनी थेट रुग्णालयात जाऊन मुलाची भेट घेतली, सुमारे एक तासांत जखमी मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आरुष चौबे असा मृत मुलाचे नाव होते. तो आठवीत शिकत होता. त्यानंतर मृतदेह महू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आणि शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की,  व्हॅनच्या धडकेत मुलाचा प्रचंड रक्तस्राव झाल्याचे पाहून व्हॅन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

व्हॅन जप्त करण्यात आली असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिस आरोपी व्हॅन चालकाच्या शोधात आहे.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. लवकरच व्हॅन चालक ताब्यात असेल अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.