
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका मुलाने मालमत्तेच्या लालसेपोटी आपल्या विधवा आईची हत्या करून तिचा मृतदेह भिंतीत गाडला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील एका तरुणाने 6 मे रोजी आई बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून तक्रारदाराच्या मुलाची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री संशयाच्या आधारे आरोपी दीपकची चौकशी करण्यात आली.
सुरुवातीला तो तरुण पोलिसांची दिशाभूल करत राहिला मात्र कडक चौकशीनंतर त्याने आईच्या हत्येची कबुली दिली. त्याने आईवर अत्याचार का केले याचाही खुलासा झाला आहे. मालमत्तेच्या लालसेपोटी त्याने आईची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह भिंतीत पुरला. मुलाने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.