Madhya Pradesh: धक्कादायक! होमवर्क केला नाही म्हणून एका चिमुकलीच्या ओठांवर दिले चटके; शिक्षिकाविरोधात गुन्हा दाखल
(Archived, edited, symbolic images)

होमवर्क केला नाही म्हणून केजीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीच्या ओठांवर चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बडवानी येथील चाचरिया परिसरात घडला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर शिक्षिकाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. यामुळे लहान शिशुमध्ये शिकणारी मुलगी आणि तिचा मोठा मोठा भाऊ संबंधित शिक्षिकेकडून ट्यूशन घेत होते. मात्र, तिने होमवर्क पूर्ण न केल्याने शिक्षिकेला राग आला. यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

हेमा ओमरे असे ट्यूशन घेणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. फिर्यादीच्या दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मोठा मुलगा आणि चार वर्षीची मुलगी हे हेमा ओमरे यांच्याकडे ट्यूशन घेत आहेत. परंतु, 19 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी ट्यूशनवरून घरी परतल्यानंतर तिच्या ओठांवर चटके दिल्याचे निशाण तिच्या पालकांना दिसले. त्यावेळी हेमा यांनीच तिला माचिसच्या काडीने चटके दिल्याने त्यांना समजले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर हेमा हिने पीडित मुलीच्या पालकांना उलट उत्तर दिले. त्यांनंतर तिच्या पालकांनी शिक्षिकेच्याविरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- Ajab Prem Ki Gajab Kahaani: असाही एक विवाह; प्रेयसलीला भेटायला प्रियकर मध्यरात्री तिच्या घरी गेला, कुटुंबीयांनी चोप चोप चोपला, सकाळी उठून जावई बनला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे पालक आरोपी शिक्षिकेच्या घरी गेले असताना होमवर्क न केल्यास मुलांना अशी शिक्षा देणे गरजेचे आहे, अशी ती म्हणाली होती. याबाबत चाचरिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरी ठाणे प्रभारी राजेंद्र सोलंकी अधिक चौकशी करत आहेत.