Lucknow Accident

Lucknow Accident Video: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किसान पथ येथे एका भरधाव कारने स्कूटरवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, धडकेनंतर स्कूटर कारच्या बोनेटखाली अडकली आणि कार चालकाने सुमारे अर्धा किलोमीटर स्कूटरला फरफटत नेले. यादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्यांनी कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने त्यांचे ऐकले नाही आणि गाडीचा वेग कमी केला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही रस्त्यावरून जाणाऱ्यांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हे देखील वाचा: Aligarh Shocker: लज्जास्पद! अलिगडमध्ये खासगी कोचिंग ऑपरेटरचे घृणास्पद कृत्य, अकरावीच्या अल्पवयीन मुलीवर सात महिने केला बलात्कार

लखनऊमध्ये कारने स्कूटरला दिली जोरदार धडक 

हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले असून या घटनेवर जोरदार टीका करत आहेत. या घटनेमुळे राजधानी लखनऊमध्ये रस्ते सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेथे भरधाव वेगात आणि बेदरकारपणामुळे असे अपघात होत आहेत. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन व्हावे यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.