6 मार्च रोजी होणार भाजप आणि AIADMK-PMK यांच्या युतीबाबत बैठक,पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार उपसस्थिती
Piyush Goyal (Photo Credits-ANI)

भाजप (BJP), एआयएडीएमके (AIADMK)आणि पीएमके (PMK) यांच्यातील युतीबाबत चेन्नई येथे 6 मार्च रोजी मोठी बैठक होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी याबाबत सोमवारी (4 मार्च) माहिती दिली आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत तमिळनाडू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पीएमकेचे वरिष्ठ नेता यांची ही उपस्थिती असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यांसंबंधीत ही बैठक चैन्नई येथे घेण्यात येणार आहे. महाआघाडी मधील नेता आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करणार आहेत. खरतर तमिळनाडू मधील सत्तारुढ अन्नाद्रमुक (AIADMK) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि पीएमके सोबत वेगवेगळी युती केली आहे. त्यामुळे तमिळनाडू येथील 39 जागांवरील पड्डुचेरीच्या संसदीय जागेवर भाजप 5 आणि पीएमके 7 जगांसाठी निवडणुक लढवणार आहे. त्याचसोबत एस. रामदास यांच्या नेतृत्वाखालील पीएमके पक्षाला राज्यसभेतील एक जागा देण्यात येणार आहे.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत पीएमके भाजपा नेतृत्वाखालील सात दलातील गठबंधनात सहभागी होते. भाजपने आठ जागांवर निवडणुक लढवली होती.तर कन्याकुमारी येथील जागेवर भाजपला विजय मिळाला होता.