Crime: लिव्ह इन पार्टनरच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराने केला बलात्काराचा प्रयत्न, रागाच्या भरात महिलेने कापले तरुणाचे लिंग
CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

एका 36 वर्षीय आईने आपल्या 32 वर्षीय प्रियकराचे लिंग (Boyfriend Penis) स्वयंपाकघरातील चाकूने कापून टाकले. कारण त्याने तिच्या 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला. भारतातील उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे ही घटना घडली आहे.  अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 36 वर्षीय आई तिच्या मद्यपी पतीपासून (Alcoholic husband) विभक्त झाल्यानंतर आई आणि मुलगी ही जोडी दोन वर्षांपासून त्या व्यक्तीसोबत राहत होती. महिलेने सांगितले की, कथित घटना घडली तेव्हा ती एका शेतात काम करत होती.

तिने दावा केला की ती वेळेत घरी पोहोचली जेव्हा तिचा प्रियकर तिच्या किशोरवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपल्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे. मी माझ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी स्वयंपाकघरातील चाकू धरला आणि त्याचे लिंग कापले. मला कोणताही पश्चात्ताप नाही, असे त्या महिलेचे म्हणणे आहे. हेही वाचा Girlfriend जेलमध्ये कैदी Boyfriend ला गेली भेटायला, Kiss केल्यानंतर तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

लखीमपूर पोलिस स्टेशनच्या एसएचओने दिलेल्या माहितीनुसार, प्रियकरावर पॉक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्याला लखनौला हलवले जाऊ शकते, असेही एसएचओने सांगितले.