Murder | (Photo Credits: PixaBay)

West Bengal Shocker: भारतीय लोकांच्या मनावर बसलेला श्रद्धा वालकर (Shraddha Walker) च्या हत्येचा धक्का ओसरत नाही. त्याआधीच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका मुलाने आईच्या साहाय्याने आपल्या पित्याची हत्या केली. मनुष्य जीवनाच्या संवेदनशीलतेला काळीमा फासणाऱ्या अशा गोष्टींमुळे मनुष्याची सदसतविवेक बुद्धी ठप्प झाली आहे की काय? असा प्रश्न पडला आहे.

मुलाने स्वतःच्या वडिलांची हत्या केल्यानंतर, हे लपवण्यासाठी आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले. या गुन्ह्यात आईचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील बरुईपूरमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेहाचे सहा तुकडे करून ते लपवून ठेवले. वस्तुस्थिती अशी आहे की, खून झालेल्या माणसाची पत्नी त्याच्यासोबत होती आणि तिने आपल्या मुलाच्या क्रूरतेचे पूर्ण समर्थन केले. (हेही वाचा -Hotel Radisson Blu: हॉटेल रॅडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांची आत्महत्या; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह)

श्रद्धाच्या हत्येप्रमाणेच या घटनेतही हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ठिकठिकाणी फेकण्यात आले होते. उज्ज्वल चक्रवर्ती नावाचा एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार आई व मुलाने पोलिसांकडे केली. पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, त्या व्यक्तीला मद्यपानाची वाईट सवय आहे आणि तो दारूच्या नशेत अनेकदा आवाज करीत असे. 14 नोव्हेंबर रोजी तो दारूच्या नशेत होता आणि त्याने घरात गोंधळ घातला. याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे अधिक काटेकोरपणे चौकशी केली असता मुलाने संपूर्ण सत्य उघड केले आणि या घटनेचा उलगडा झाला.

त्यानंतरच्या तपासादरम्यान शहराच्या एका भागात शरीराच्या वरच्या भागाचे काही तुकडे सापडले. हे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत टाकून तलावात फेकून दिल्याचे आरोपीने उघड केले होते. मृतदेहाचा काही भाग सापडला असला तरी उर्वरित शरीराचे भाग शोधन्याचे काम सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

पोलीस अधीक्षक पुष्पा यांनी सांगितले की, मृत वडील हे नौदलाचे निवृत्त अधिकारी होते. तसेच 14 नोव्हेंबर रोजी उज्ज्वल चक्रवर्ती यांचे कुटुंबीयांशी भांडण झाले होते. दरम्यान, त्याच्या मुलाने त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर मुलाने आईसोबत कट रचला आणि मृतदेह लपवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे भिरकावले. हत्येला 3-4 तास उलटूनही आई-मुलाला काय करावे हे समजत नसताना दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची आठवण झाली. त्या घटनेप्रमाणे पुरावे नष्ट करण्याचे दोघांनी ठरवले. घरात रक्ताचे डाग पडू नयेत म्हणून मृतदेह बाथरूममध्ये कापून ठेवण्याची आईची कल्पना होती. चेन्नईला पॉलिटेक्निकची परीक्षा देण्यासाठी मुलाने वडिलांकडे 3000 रुपये मागितल्याने हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.