Dubai Expo 2020: दुबई एक्स्पो 2020 मध्ये इंडिया पॅव्हेलियन केले लाँच, यूएई आणि भारतामधील संबंध अधिक खोल होणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मत
PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

दुबई एक्स्पो 2020 (Dubai Expo 2020) युएई (UAE) मध्ये सुरू झाला आहे.  यासोबतच येथे इंडिया पॅव्हेलियनचेही (India Pavilion) लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी दुबई येथे एक्सपो 2020 मध्ये इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. दुबई एक्सपो 2020 मध्ये इंडिया पॅव्हेलियनच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, एक्सपो 2020 ची मुख्य थीम कनेक्टिंग माइंड्स, क्रिएटिंग द फ्यूचर आहे. भारताच्या प्रयत्नांमध्येही त्याची भावना दिसून येते. कारण आपण नवीन भारताच्या उभारणीसाठी पुढे जात आहोत. पंतप्रधान म्हणाले की भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करत आहे. आम्ही सर्वांना इंडिया पॅव्हेलियनला भेट देण्यासाठी आणि नवीन भारतातील संधींचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 7 वर्षात भारत सरकारने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. हा ट्रेंड पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत राहू. तसेच म्हटले आहे की भारत त्याच्या चैतन्य आणि विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या संस्कृती, भाषा, पाककृती, कला, संगीत आणि नृत्ये आहेत. ही विविधता आपल्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये दिसून येते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत या एक्स्पोमध्ये सर्वात मोठ्या इंडिया पॅव्हेलियनसह सहभागी होत आहे. मला खात्री आहे की हा एक्सपो संयुक्त अरब अमिराती आणि दुबईसोबतचे आपले खोल आणि ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी खूप पुढे जाईल.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दुबईत इंडिया पॅव्हेलियनच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले की, भारत-युएईचे संबंध सिंधू संस्कृतीच्या आजपर्यंतच्या काळात सापडतात.  एक्सपोमध्ये आमच्या मोठ्या उपस्थितीचे एक कारण म्हणजे युएई सोबत आमची विशेष भागीदारी आहे. इंडिया पॅव्हेलियन हे जगभरातील भारतीय नागरिकांच्या अभिमान, क्षमता आणि शक्तीचे प्रतीक आहे. भारत जागतिक आर्थिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.