Sutlej Express Photo Crdeit TWITTER

 Sutlej Express Train: उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात आज पहाटे चारच्या सुमारास रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. किसान एक्स्प्रेस ट्रेन दोन भागात विभागली गेली. या ट्रेनमध्ये पोलिस भरतीचे अनेक उमेदवार प्रवास करत होते. ते युपी पोलिस कॉन्स्टेबल भरती परिक्षेला बसणार होते. रेल्वेच्या अपघातामुळे उमेदवार परिक्षा देऊ शकले नाहीत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा- बिहारमधील भागलपूरमध्ये कोसळलेल्या बंधाऱ्याची पाहणी करताना मुख्य अभियंता गंगा नदीत वाहून गेला, पहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजता सेहौरा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे ट्रेनचा एसी कोच तुटला, त्यामुळे ट्रेनचे दोन भाग झाले. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. ट्रेनमध्ये यूपी पोलिस कॉन्स्टेबल परिक्षेसाठी जात होते. या दुर्घटनेमुळे उमेदवार परिक्षेपासून वंचित राहिले.

रेल्वेचा तांत्रिक बिघाड 

अपघाताची माहिती मिळताच, रेल्वे आणि पोलिस विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले. अपघातात कोणही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. रेल्वे विभागाने तांत्रिक बिघाडाची चौकशी सुरु केली. या घटनेचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये गोंधळाचे वातावरण होते. परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या अनेक प्रवाशांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत ही दिलासादायक बाब आहे.