
Keral Crime News: केरळच्या (Keral) कोझिकोड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलाने 17 वर्षाच्या तरुणीवर चाकूने वार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे संपुर्ण जिल्हा हादरला होता. मिळालेल्या माहिती नुसार, 28 वर्षीय तरुणाने तरुणीसमोर लग्नाची मागणी केल्यावर तरुणीने यासा नकार दिला. याचाच राग धरत त्याने तरुणीवर चाकूने वार केला. ही क्रूर घटना कॅमेरात कैद झाली आहे. दुपारी दोन वाजता ही घटना घडली. भररस्त्यात नादापूरमध्ये घडली.
कॅमेरात दिसल्या प्रमाणे आरोपीने तरुणीला पकडून धक्काबुक्की केली. अर्शद असं या आरोपीचे नाव आहे. आरोपीने तरुणीवर चाकू मारण्यापूर्वी मारहाण केली. नंतर तीच्यावर चाकूने हल्ला केला. जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अर्शद मुलीवर हल्ला करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. जवळच्या व्यापाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून मुलीची सुटका केली.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीने आरोपी अर्शदसोबत लग्न करण्यास नकार दिला. काही महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न ठरले होते पण तीने लग्न मोडले होते. अर्शद मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावत असे आणि यामुळे मुलीचे कुटुंब दुसरीकडे गेले. मात्र, तरीही अर्शदने तरुणीवर सुनियोजित हल्ला केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी अर्शदला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.