Delhi Malviya Nagar Murder Case: दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये कमला नेहरू कॉलेजच्या विद्यार्थिनीवर रॉडने हल्ला; पीडितेचा जागीच मृत्यू
Delhi Malviya Nagar Murder Case (PC - ANI)

Delhi Malviya Nagar Murder Case: दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर (Malviya Nagar) भागात शुक्रवारी एका विद्यार्थिनीवर रॉडने हल्ला (Murder) केल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. ही तरुणी दिल्ली विद्यापीठाच्या कमला नेहरू कॉलेज (Kamala Nehru College) ची विद्यार्थिनी होती. हल्ल्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालय प्रशासनाने तिला मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दक्षिण दिल्लीचे डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, आम्हाला अशी माहिती मिळाली की दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथील अरबिंदो कॉलेजजवळ एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या मृतदेहाजवळ लोखंडी रॉड सापडला आहे. प्राथमिक तपासणीनुसार, तरुणीवर रॉडने हल्ला करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा - Delhi Kanjhawala Case: दिल्लीतील कांजवाला प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय; चारही आरोपींविरोधात चालणार खुनाचा खटला)

दरम्यान, अरबिंदो कॉलेजच्या पार्कमध्ये एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचा फोन पोलिसांना पीसीआरवर आला होता. अरबिंदो कॉलेजच्या बाहेर एका मुलीवर रॉडने हल्ला झाल्याचा फोन पोलिसांना आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तरुणीचा मृत्यू झाला होता.