धनबाद: अतिदक्षता विभागात असलेल्या कॅन्सर रुग्णावर उंदरांचा हल्ला, हातपाय कुडतडले
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

झारखंड (Jharkhand) येथील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कॅन्सर रुग्णावर चक्क उंदरांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.  उंदरांनी त्या वक्तीचे हातपाय कुडतले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शमीम मल्लिक असे कॅन्सरग्रस्त वक्तीचे नाव आहे.  धनबाद (Dhanbad) मधील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या पीडित व्यक्तीला रात्रीच्या वेळेस उंदरांनी हल्ला करत कबंरेच्या खालील भाग कुडतला. या प्रकारावर व्यक्तीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.(उत्तर प्रदेश: प्रसादामध्ये देण्यात आलेले दुध प्यायल्याने 12 मुलांची प्रकृती बिघडली)

रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट फार असल्याची तक्रार प्रशासनाला करण्यात आली होती. अद्याप या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हटले जात आहेत. उंदरांच्या या उपद्रवामुळे व्यक्तीला यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत.