जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर शाम सोफी (Commander Sham Sophie) जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये (Tral) चकमकीत ठार झाला आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार (IGP Vijay Kumar) यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की,अवंतीपोराच्या (Avantipora) त्राल भागातील तिलवानी मोहल्लामध्ये (Tilwani Mohalla) चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसात सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला. सोमवारी आणि मंगळवारी शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. सीआरपीएफ, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू -काश्मीर पोलिसांचे 178 बटालियन शोपियान जिल्ह्यातील तुलान आणि फेरीपोरा भागात या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलांना या भागात संशयित दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर विशेष ऑपरेशन करण्यात आले. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली. तथापि, सुरक्षा दलांना या प्रकरणात लक्षणीय यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी निवासी परिसरातील एका घरात लपले आहेत. सुरक्षा दलाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
Encounter has started at Tilwani Mohalla in Tral area of Awantipora. Police & security forces are on the job. Further details shall follow: J&K Police
— ANI (@ANI) October 13, 2021
शोपियानमध्ये, तुलान परिसरात चकमक झाली. ज्यात लष्करच्या टीआरएफ संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. येथे मुख्तार शाह असे एका दहशतवाद्याचे नाव होते. जो गंदरबालचा रहिवासी होता आणि तो श्रीनगरमधील रस्त्यावर विक्रेता वीरेंद्र पासवानच्या हत्येत सहभागी होता. हल्ल्यानंतर दहशतवादी शोपियांकडे पळून गेला. याशिवाय दुसरी चकमक शोपियानच्या फेरीपोरा भागात झाली. येथे दोन दहशतवादी मारले गेले. गेल्या 36 तासांत सुरक्षा दलांनी सात दहशतवाद्यांचा खात्मा केला.
#UPDATE | Top JeM Commander terrorist Sham Sofi killed in Tral Encounter: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/kUDRIHk5XE
— ANI (@ANI) October 13, 2021
याशिवाय पूंछ राजौरी परिसरातील बगाई जंगलांमध्येही सुरक्षा दलाने गेल्या दोन दिवसांपासून शोधमोहीम राबवली आहे. पुंछ भागातच दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद झाले. तेव्हापासून सुरक्षा दल दहशतवाद्यांचे सुराग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीरचे आयजी म्हणाले होते की आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवू. अलीकडच्या काळात दहशतवाद्यांनी नागरिकांना लक्ष्य केले आणि सात जणांचा बळी घेतला. त्यानंतर आम्ही प्रतिशोधात्मक कारवाई सुरू केली. श्रीनगर, अनंतनागसह अनेक क्षेत्रात आम्हाला यश मिळाले आहे.