Asaduddin Owaisi On Islam: इस्लामने भारताला लोकशाहीची भेट दिली; असदुद्दीन ओवेसी यांचा दावा
Asaduddin Owaisi l (Photo Credits: Facebook)

Asaduddin Owaisi On Islam: इस्लाम (Islam) ने भारताला लोकशाहीची (Democracy) भेट दिली आहे, असं मत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मांडलं आहे. न्यूज 24 ने ओवेसींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये ओवेसी इस्लामवर व्याख्यान देताना दिसत आहेत. यामध्ये ते इंग्रजीतून हिंदीत अनुवाद करताना दिसत आहे. ओवेसी यांनीही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर ओवेसीचा हा व्हिडिओ युजर्सचे खूप लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये असदुद्दीन ओवेसी काही माहिती वाचून सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ओवेसी म्हणत आहेत की, "या देशात आलेले शेवटचे तीन कारवां इस्लामचे होते, जे येथे येऊन स्थायिक झाले. गंगा आणि यमुना ज्या प्रकारे वेगवेगळ्या भागांतून उगम पावतात, पण निसर्गाच्या नियमामुळे ते जेव्हा भेटतात तेव्हा त्याला संगम म्हणतात. आम्ही आमचा खजिना इथे आणला. आम्ही आमचे बंद दरवाजे उघडले आणि सर्व काही दिले आणि इस्लामने या देशाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे लोकशाहीची देणगी." (हेही वाचा - Successor Of Lalit Modi: निवृत्त होण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आली म्हणत ललित मोदींनी उत्तराधिकाऱ्याची घोषणा, मुलगा रुचिर मोदीची केली नियुक्ती)

असदुद्दीन ओवेसी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शनिवारी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीला कथितपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

तोच व्हिडिओ ट्विट करत ओवेसी यांनी लिहिले की, "असिम हुसैन यांना ट्रेनमध्ये मारहाण करण्यात आली, त्यांचे कपडे काढण्यात आले आणि JSR चे नारे लावण्यास भाग पाडण्यात आले. आरएसएसच्या मोहन यांनी 'हजार वर्षांच्या युद्धा'बद्दल सांगितले होते, हा त्याच युद्धाचा आणखी एक पुरावा आहे का? यूपी पोलिस आणि आरपीएफ उत्तर रेल्वेने यावर कठोर कारवाई करावी," अशी मागणी ओवेसींनी केली.