आयसिस संघटना संशयित अटक (फोटो सौजन्य- ANI)

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आयसिस (ISIS) दहशवाती संघटनेचा उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) आणि दिल्ली (Delhi) मधील कट उधळून लावला  आहे. या संघटनेतील गँगस्टर हाफिज याला NIA कडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात बुधवारी एकूण 16 ठिकाणी पोलिसांकडून धाड टाकण्यात आली. त्यामध्ये आयसिसच्या नवीन मॉड्युलमधील 'हरकत उल हर्ब ए इस्लाम'(Harkat ul harb e islam) या संघटनेचा कट उधळला आहे.

आयसिस संघटनेतील पाच संशयितांना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून अटक करण्यात आली आहे. तर हाफिज उर्फ सोहेल या तरुणाचा समावेश आहे. तर हाफिज हा कथित गँगस्टर आहे.तर NIA कडून अटक करण्यात आलेल्या संशयित हे सर्व सदस्य सोशल मिडियाच्या माध्यमातून आले असल्याचे सांगितले जात आहे. हाफिजच्या वडिलांना मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांनी घराची झटती घेण्यास सुरुवात केली होती. परंतु त्या अज्ञात व्यक्तींना घरात काहीच मिळाले नाही. (हेही वाचा- उत्तर प्रदेशमध्ये ISISचा नावा चेहरा उघडकीस?; RSSचे कार्यालय होते निशाण्यावर)

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून 5 संशयितांना अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतील जाफराबाद येथील ठिकाणांवर छापा मारण्यात आला असून काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.