
International Yoga Day 2024: काश्मीरमध्ये शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रम विस्कळीत झाले. त्यामुळे दल सरोवराच्या काठावर योग दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाला अद्याप सुरुवात होऊ शकली नाही. या सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे सकाळी 6.30 वाजता मुख्य कार्यक्रम सुरू होणार होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोऱ्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे उघड्यावर योगासने करणे कठीण झाले आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी योग कार्यक्रमाचे नेतृत्व करणार असलेल्या दल सरोवराच्या आजूबाजूला मुसळधार पाऊस पडत आहे.