OMG! एक पंखा आणि दोन बल्ब लावले; 1.73 कोटी रुपयांचे बिल आल्याने मजूर झाला अवाक; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या
Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Uttar Pradesh: वीज विभागाने (Electricity Department) एका ग्राहकाच्या घराला एक कोटी 73 लाखांचे बिल (Light Bill) पाठवले आहे. पीडित ग्राहकाच्या छोट्या घरात फक्त दोन बल्ब आणि एक पंखा आहे. तो मुंबईत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. वीज बिलाच्या माहितीवरून तो घरी परतला. मजूराला आतापर्यंत अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने मिळाली आहेत. यामुळे तो आजारी पडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

प्राप्त माहितीनुसार, संथा ब्लॉकच्या कास्या गावातील रहिवासी असलेल्या राजेश यांनी 2019 मध्ये 1 KW घरगुती कनेक्शन घेतले होते. त्यांनी वेळोवेळी वीजबिलही जमा केले होते. त्याच्या घरात एकच पंखा दोन बल्ब आहेत. राजेश मुंबईत मजुरीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी रीना यांच्या मोबाईलवर वीज विभागाने 17339576 रुपयांचे बिल पाठवले होते. रीनाने पती राजेश यांना वीज विभागाने पाठवलेल्या बिलाची माहिती दिली.

एवढी मोठी रक्कम ऐकून राजेश आश्चर्यचकित झाला. वीज विभागाने एवढे बिल कसे पाठवले यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. या प्रकरणी पीडितेने विद्युत विभागाकडे तक्रारही केली, मात्र प्रकरण मिटलेले नाही. नंतर बिलाचा निपटारा करण्यासाठी तो गावात आला. वीज विभागाच्या निष्काळजीपणावर लोक अनेक आरोप करत आहेत.

विभागाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. ही बाब विभागीय त्रुटीची असल्याचे कार्यकारी अभियंता मेहदवाल सरोज कुमार यांनी सांगितले. याची माहिती घेऊुन ग्राहकांना पूर्ण मदत केली जाईल. या प्रकरणात ज्या स्तरावरून निष्काळजीपणा करण्यात आला आहे, त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही अधिकाऱ्याने दिलं आहे.