up shocker PC TW

UP Shocker: उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून एका महिलेला तिच्या तीन अल्पवयीन मुलांसमोर गावकऱ्यांनी अमानुष वागणूक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेला प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून अमानुषा वागणुक दिल्याचे समोर आले आहे. पीडितेला झाडाला बांधून ठेवले आहे. त्यानंतर तीच्या तोंडाला काळे फासले आहे. ऐवढं नाही तर तिच्या गळ्यात चप्पलांचा हार देखील घातला आहे. (हेही वाचा- बिहारच्या नवादा येथून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 11 सायबर गुन्हेगारांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगढ येथील रहिवासी असलेली महिला एका व्यक्तीसोबत प्रेमात पडली होती. महिलेला तीन अल्पवयीन मुले असल्याचे समोर येत आहे. या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि पीडित महिलेला क्रुर वागणूक दिली. भरचौकात महिलेला एका झाडाला बांधून ठेवले आहे. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर काळे फासले आणि तिला चप्पलेंचा हार परिधान केला आहे.

या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ ही व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पीडित महिलेचे मुलं तिच्या बाजूला उभे आहेत. महिलेला बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आता पर्यंत २५ जणांवर गुन्हा दाखल केला तर १७ जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केला आहे.