Thane Pothole Death: ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पलटी झाल्याने ३१ वर्षीय ठाणेकराचा मृत्यू
Thane Pothole Accident (Photo Credits: Twitter)

ठाणे : प्रगतीच्या हेतूने केल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी योग्य न झाल्याने आजवर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ठाण्यात देखील आज सकाळी एका तरुणाचा रस्त्यावर ड्रेनेजची लाईन (Drainage line Work) टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात (Pithole)  कार पलटी होऊन सचिन काकोडकर (Sachin Kakodkar)  या 31 वर्षीय गृहस्थाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र टाइम्सच्या सूत्रानुसार समजत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम गेले काही दिवस सुरु होते. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यातचे काम दिलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास घोडबंदर रोड वरील मुल्ला बाग बस डेपो जवळ सचिन काकोडकर यांच्या मारुती सुझुकी आर्टिका य गाडीचा भीषण अपघात झाला. नीलकंठ ग्रीन्सजवळून घोडबंदर कडे जाणाऱ्या रस्त्यात ईगल कंस्ट्रक्शन कंपनीबने ड्रेनेज लाईनच्या कामासाठी एक मोठा खड्डा खोदला आहे. या खड्डयाच्या जवळील मुल्ला बाग बस डेपो जवळ पोहचत असताना या भल्या मोठ्या खड्ड्यात त्यांची गाडी पलटी झाली. एकाएकी हा प्रकार झाल्याने गोंधळलेल्या सचिन ना गंभीर मार लागला होता, त्यामुळे कार मधून बाहेर पडणेही त्यांना शक्य झाले नाही. या नंतर तात्काळ जखमी काकोडकर यांना बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खड्यांमुळे झालेल्या अपघातात 15 हजार मृत्यू; रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर नितीन गडकरी कंत्राटदारावर बुलडोजर चालवणार

खडड्यात कार पलटी झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन एक एमर्जन्सी टेंडर आणि रेस्क्यू वाहनाच्या सहाय्याने ही कार खडड्यातून बाहेर काढली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.