SBI (Photo Credits: Facebook)

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एसबीआय आपला युपीआय (UPI) प्लॅटफॉर्म अपग्रेड करत असल्याने आज 14 मार्च रोजी बँकेच्या युपीआय सेवेमध्ये काही समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. याची माहिती स्टेट बँकेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (SBI Doorstep Banking: एसबीआय ग्राहकांच्या घरी जाऊन देते 'या' सुविधा; जाणून घ्या डोअरस्टेप बँकिंग सेवेशी संबंधित खास गोष्टी)

या ट्विटमध्ये बँकेने म्हटले की, 14 मार्च रोजी युपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करण्यात येणार असल्याने ग्राहकांना युपीआय सेवेचा वापर करताना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु, ग्राहक पर्यायी वापरासाठी बँकेच्या इतर डिजिटल माध्यमांचा वापर करु शकतात. यासाठी ग्राहकांकडे योनो, योनो लाइट, नेट बँकींग किंवा एटीएम (डेबिट कार्ड) हे पर्याय आहेत. तसंच एसबीआयने आपल्या निवेदनात म्हटले की, अखंड बँकिंगचा अनुभव देण्यासाठी आणि आमच्या सेवा सुधारण्यासाठी आमच्या ग्राहकांना सहकार्य करण्याची आम्ही विनंती करतो.

SBI Tweet:

मात्र ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी बँकेने नेट बँकिंगची योनो, योनो लाइट किंवा अन्य डिजिटल  चॅनेल वापरण्याची सूचना केली. अपग्रेडींगच्या कामाचा यावर काही परिणाम होणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कोट्यावधी ग्राहक आहेत. दरम्यान, ग्राहकांना सतर्क करण्यासाठी किंवा बँकिंग सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी एसबीआय ट्विटच्या माध्यमातून अपडेट्स देत असते.