The Sovereign Gold Bond Scheme 2020-21 - Series IX 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 जानेवारी 2021 पर्यंत खुल्या असणार्या गोल्ड बॉन्डसाठी आरबीआयने किंमत जाहीर केली आहे. या आगामी सीरीजमधील गोल्ड बॉन्डमध्ये प्रतिग्राम सोन्याची किंमत 5000 रूपये असेल. दरम्यान जर गुंतवणूकदारांनी ऑनलाईन अप्लाय आणि पेमेंट केल्यास डिजिटल मोड मधील व्यवहारामध्ये गोल्ड बॉन्ड प्रतिग्राम 4950 रूपये असे उपलब्ध असतील.
गोल्ड बॉन्डच्या Series VIII मध्ये मागील महिन्यात 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान सोन्याचा दर हा प्रतिग्राम 5177 रूपये इतका ठेवण्यात आला होता. Sovereign Gold Bond 2020-21 हे भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कडून इश्यू केले जातात. Sovereign Gold Bond Scheme: दिवाळी, धनतेरसच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; आजपासून सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या 8 व्या सीरीजला सुरूवात.
बॉन्ड किमान 1 ग्राम पासून पुढे त्याच पटीत उपलब्ध असतात. एकदा गुंतवणूक केल्यानंतर 8 वर्षांसाठी ते असतात. पाचव्या वर्षानंतर एक्झिट ऑप्शन असतो. वैयक्तिक सामान्य गुंतवणूकदारासाठी ही मर्यादा किमान 1 ग्राम ते 4 किलो असते. तर ट्रस्टसाठी 20 किलो आहे.
सॉव्हरिंग गोल्ड बॉन्ड स्किम हा नोव्हेंबर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये फिजिकल गोल्ड घेण्याकडे असलेला कल कमी करण्यासाठी आणि सेव्हिंगसाठी पर्याय म्हणून लॉन्च करण्यात आला आहे.